बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“इथं लोकांना प्यायला पाणी नाही आणि तुम्ही नाव कसलं बदलता”

औरंगाबाद | येत्या काही दिवसात औरंगाबाद महापालिकेची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वच पक्ष तयारीला लागलेले दिसत आहेत. त्यामुळे आता आरोप प्रत्यारोपाचं वारं वाहताना दिसतंय. गेल्या अनेक वर्षापासून औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावं, अशी मागणी प्रामुख्यानं शिवसेनेकडून करण्यात येत आहे. त्यानंतर आता याच मुद्द्यावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.

इथं लोकांना प्यायला पाणी नाही आणि तुम्ही नाव कसलं बदलता?, असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे. तर, औरंगाबाद शहराचा विकास करा. शहराला फाईव्ह स्टार कॅटेगिरीमध्ये आणा, असा सल्ला देखील त्यांनी दिलाय. एमआयएमने औरंगाबादच्या नामांतराला सुरूवातीपासून विरोध केला आहे. त्यामुळे येणारी महापालिका निवडणूक ‘संभाजीनगर की औरंगाबाद’ याचं मुद्द्यावरून रंगण्याची शक्यता आहे.

शिवसेना गेल्या काही वर्षांपासून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करताना दिसत आहे. तर या मुद्द्यावरून भाजपचा देखील शिवसेनेला पाठिंबा असलेला दिसतोय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने मात्र, औरंगाबादच्या नामंतरास विरोध केला आहे. त्यामुळे औरंगाबादच्या निवडणुकीत युती-आघाडीची समीकरणे आता बिघडताना दिसत आहेत.

दरम्यान, निवडणूकीच्या पाश्वभूमीवर सेना आणि भाजपमध्ये शाब्दिक चकमकी होताना दिसत आहे. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भागवत करांडावर निशाणा साधला होता. तर मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून भाजपला मराठवाड्यात जिंकू देणार नसल्याचं देखील खैरे यांनी सांगितलं होतं.

थोडक्यात बातम्या

महाराष्ट्र कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

‘लष्करात भरती करुन आम्हालासुद्धा देशसेवेची संधी द्या’; तृतीयपंथियांची पंतप्रधानांकडे मागणी

केंद्रात काही नेते फक्त भाषणं देतात, गडकरी प्रामाणिकपणे काम करतात- बच्चू कडू

“जनतेनं फेकून दिलं होतं, उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादामुळे तुम्ही आज सत्तेत आहात”

“भविष्यात असे राज्यपाल येतील असं बाबासाहेब आंबेडकरांनाही कधी वाटलं नसेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More