नवी दिल्ली | देशातील जनतेने मोदी सरकारला फक्त सत्तेत राहण्यासाठी नव्हे तर कठोर सुधारणा रेटण्यासाठीच बहुमत दिलं आहे, असं वक्तव्य केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केलं आहे.
‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात नरेंद्र सिंह तोमर यांनी केंद्र सरकारची बाजू स्पष्ट केली. त्यावेळी ते बोलतं होते.
नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या कार्यकाळात अनेक सुधारणा केल्या. नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयानंतर सरकारची उलटी गणती सुरु झाली, असे अनेकांनी म्हटले. मात्र, 2019 च्या निवडणुकीत जनतेने मोदी सरकारला 287 जागांऐवजी 303 जागांचे भक्कम संख्याबळ मिळवून दिले.”
दरम्यान, 9 डिसेंबर रोजी सरकारने शेतकऱ्यांना एक प्रस्ताव पाठवला होता. सरकारने दिलेला हा तडजोडीचा प्रस्ताव शेतकरी ज्यादिवशी मान्य करतील तेव्हा केंद्र सरकार आंदोलकांना पुन्हा चर्चेसाठी बोलवलं, असं नरेंद्र सिंह तोमर यांनी स्पष्ट केलं.
थोडक्यात बातम्या-
“भाजपने मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर समाजाची दिशाभूल करणे थांबवावं”
“भाजपचा झेंडा गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेण्यात चंद्रकांत पाटील यांचा सिंहाचा वाटा”
“चांगल्या कामात केंद्र सरकारचं मांजर का आडवं जातं?”
…तर महाराष्ट्रालाही तुमच्या बोलवत्या बापाचा शोध घ्यावा लागेल- संजय राऊत
मी ऊसतोड कामगाराचाच मुलगा, ऊसतोड कामगारांना विशेष सहाय्य मिळवून देणार- धनंजय मुंडे