बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईत ‘या’ ठिकाणी राहणाऱ्या लोकांंना आहे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका

मुंबई | भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: थैमान घातलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लाखो लोकांची घरं उजाड केली आहेत. गेल्या आठवड्यापासून कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागल्याची चिन्ह दिसत आहेत. मात्र, अशातच आता भारतात लवकरच कोरोनाची तिसरी लाट येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना बसू शकतो, असं बोललं जात आहे. लहान मुलांबरोबरंच झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना देखील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही शक्यता लक्षात घेऊन मुंबई महापालिकेनं त्या दृष्टीने पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे.

कोरोनाच्या तिसरा लाटेची दक्षता म्हणून मुंबई महापालिका झोपडपट्ट्यांमध्ये सार्वजनिक शौचालय आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्यावर भर देणार आहे. तसेच मुंबई महापालिका बालरोगतज्ज्ञांना विशेष भर देणार आहे.  महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सर्व अधिकाऱ्यांना तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

पहिल्या लाटेचा झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकसंख्येवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. तर दुसऱ्या लाटेत बहुमजली ईमारती आणि युवकांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण जास्त होते, असं महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तसेच अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी सर्व वॉर्डांना बालरोग तज्ज्ञांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

थोडक्यात बातम्या –

कोरोनामुक्त होणारी गाव होणारं लखपती, सरकारने केली ‘या’ खास स्पर्धेची घोषणा

लग्नात नवरदेवानं नवरीच्या पायावर डोकं टेकवलं, जाणून घ्या व्हायरल फोटोमागची कहानी!

“खासगी रूग्णालयांप्रमाणे आम्हीही केंद्राला पैसे देतो, आम्हालाही लसी द्याव्यात”

काय सांगता! ‘या’ ठिकाणी मिळतंय चक्क 1 रुपया 46 पैसे प्रती लीटर पेट्रोल

महत्त्वाची बातमी! पुण्यात सुरु झालेली ही दुकानं राहणार बंद, महापौरांनी ट्विट करत दिली माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More