Top News

भाजपात जाणाऱ्या पिचडांविरोधात मतदारसंघातली जनता ‘या’ कारणामुळे आक्रमक!

Loading...

अहमदनगर | अकोले तालुक्यातील आदिवासी बांधवांनी आमदार वैभव आणि माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्याविरोधात जनआक्रोश मोर्चा काढला आहे. पिचड यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली.

पिचड यांच्यावर आदिवासींच्या जमिनी बळकावल्याचा आरोप आहे. आदिवासी नेते अशोक भांगरे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी अकोल्यात(अहमदनगर) मोर्चा काढला. त्यामुळे पिचड यांच्या चिंता वाढल्या आहेत.

Loading...

अकोल्यात कार्यकर्ता मेळावा घेऊन वैभव पिचड यांनी आपल्या भाजप प्रवेशाची घोषणा केली. राज्यात आघाडीची सत्ता येणार नाही, म्हणून भाजपात जायोत, असं स्पष्टीकरण त्यांनी राष्ट्रवादी सोडताना दिलं होतं. मात्र त्यांना आता मतदारसंघातल्याच लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे.

दरम्यान, मतदारसंघातील लोकांनीच पिचड पिता-पुत्रांच्या विरोधात मोर्चा काढून पिचडांच्या अडचणी वाढवल्या आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-पवारांची साथ सोडताना अन् भाजप प्रवेश करताना शिवेंद्रराजेेे म्हणतात…

-अमित ठाकरेंचा दणका; ‘हा’ निर्णय घ्यायला रेल्वे प्रशासनाला पाडलं भाग!

राष्ट्रवादीला धक्क्यावर धक्के! शिवेंद्रराजेंनी दिला राजीनामा

Loading...

-काँग्रेसच्या सत्यजीत तांबेंना उचलायचाय विखेंना हरवण्याचा विडा!

-‘सीसीडी’चे मालक बेपत्ता; सापडलं भावनिक पत्र

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या