काँग्रेसला धक्क्यावर धक्के! स्टार प्रचारकानेच केला भाजपमध्ये प्रवेश
नवी दिल्ली | उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलाच तापलं आहे. विविध पक्षांमध्ये प्रवेश करण्याचे राजकीय नेत्यांचं सत्र सुरू आहे. त्यातच आता काँग्रेस नेते आरपीएन सिंह यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीमधील भाजप मुख्यालयात त्यांना प्रवेश देण्यात आला आहे.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आरपीएन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. पंतप्रधानांनी राष्ट्रनिर्माण करण्याचं काम केलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये कायदा सुव्यवस्था सुधरवण्याचं काम केल आहे, असंही आरपीएन सिंह यांनी म्हटलं आहे.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आरपीएन सिंह यांनी काँग्रेसवर काही सवाल उपस्थित केले आहेत. अनेक दिवसांपासून लोक भाजपमध्ये जाण्याचा सल्ला देत होते. परंतु, देर आय, दुरूस्त आय, असं त्यांनी म्हटलं आहे. मी पुर्वांचलमधून येतो, या गोष्टीचा मला अभिमान आहे. डबल इंजिन सरकारने खुप विकासकामे केली आहेत, असंही आरपीएन सिंह यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आरपीएन सिंह यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने प्रियंका गांधीनी टीकास्त्र सोडले आहे. भाजपाविरोधात लढण्यासाठी साहस आणि धैर्याची आवश्यकता आहे. घाबरणारे लोक लढू शकत नाही, असं प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत. विशेष बाब म्हणजे सोमवारी काँग्रेस पक्षाकडून आरपीएन सिंह यांचा स्टार प्रचारकांमध्ये समावेश करण्यात आला होता.
थोडक्यात बातम्या-
“किरीट सोमय्या भाजपच्या आयटम गर्ल सारखे राजकारण करतात”
प्रत्येकाला ओमिक्राॅन होणार का???; WHOने दिली महत्त्वाची माहिती
लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर, डाॅक्टर म्हणतात…
“…त्यानंतर विराटने लग्न करायला पाहिजे होतं”, शोएब अख्तरने किंग कोहलीला डिवचलं
नवाब मलिक यांचा खळबळजनक दावा म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे युतीमधून…”
Comments are closed.