Top News राजकारण

‘मी विनोदी आहे की नाही ते जनता ठरवेल’, चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना प्रत्युत्तर

पुणे | विनोदी विधानं करणं हा चंद्रकांत पाटलांचा लौकीक अशा शब्दांत राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला लगावला. तर चंद्रकांत पाटील यांनी देखील शरद पवांराना चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.

शरद पवारांच्या टीकेला उत्तर देताना, मी विनोदी आहे की नाही ते जनता ठरवेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान शरद पवार सहसा खालच्या लेव्हलची स्टेटमेंट्स करत नाहीत. मात्र आता ते असं का करत आहेत ते माहिती नाही, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, “महाविकास आघाडीचा एकच अजेंडा आहे की भाजपला निवडणुकीत वेगळं ठेवणं. आम्ही अनेकदा त्यांना एकट्याने लढण्याचं आव्हान दिलंय. परंतु ते घाबरतात आणि एकत्र लढतात. तरी देखील आम्ही पराभवाचं चिंतन करु.”

महत्वाच्या बातम्या-

“आम्ही एक तरी जिंकलो, पण ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही”

“संयम, शिस्त दाखवली हल्लाबोल कुठे आणि कधी करायचा हे देखील आम्हाला माहीत आहे”

‘शिक्षण क्षेत्रातील खऱ्या नेतृत्त्वाला मानाचा मुजरा’; सोलापुरच्या शिक्षकाचं तुकाराम मुंढेंकडून कौतुक

14-15 डिसेंबरला मुंबईत होणार हिवाळी आधिवेशन!

“हे यश म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या