बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

OBC Reservation: ओबीसी आरक्षणासाठी ठाकरे सरकारनं उचललं ‘हे’ मोठं पाऊल

मुंबई | सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) स्थगिती दिल्यानंतर राज्यातील हालचालींनी वेग घेतला आहे. महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi government) ओबीसींचं राजकीय आरक्षण परत मिळवण्याचे प्रत्येक मार्ग तपासून पाहाण्यात येत आहेत. तोंडावर आलेल्या निवडणुका, विरोधकांची टीका, या पार्श्वभूमीवर सरकारनं सर्वोच्च न्यायालायात एक महत्त्वाची याचिका (Petition) दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकित राज्यात होणाऱ्या सर्व निवडणुका ओबीसी आरक्षणाचा निर्णय येईपर्यंत रद्द करण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ लागलीच दिल्लीला रवाना झाले आहेत.

छगन भुजबळ यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकिल मुकुल रोहतगी हे ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत. राज्य सरकारतर्फे ही याचिका दाखल झाल्यानंतर जोरदार युक्तीवाद केला जाणार आहे. राज्य सरकारसमोर ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मोठा प्रश्न सध्या उभा राहीला आहे.

दरम्यान, ओबीसी समाजाच्या 27 टक्के राजकीय आरक्षणाचा प्रश्न सध्या गंभीर बनला आहे. या प्रश्नाला सर्वात जास्त कारणीभूत ओबीसींचा इम्पेरिकल डाटा आहे. परिणामी ठाकरे सरकारसमोर ओबीसी समाजाच्या आरक्षणाला परत मिळवण्याचा मोठा प्रश्न आहे.

थोडक्यात बातम्या 

“शरद पवारांचं ठरलंय, 2024 मध्येही उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री करायचंय”

शेतकरी आंदोलन अखेर मागे! मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या पाच मागण्या मान्य

आधी अल्टीमेटम, मग हकालपट्टी! आता बीसीसीआय म्हणते, “Thank you Kohli”

“दुनिया में चु*** कमी नही”, व्हिडीओ शेअर करत संजय राऊत म्हणतात…

धक्कादायक! हेलिकॉप्टर अपघातग्रस्तांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा Accident

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More