तेल कंपन्यांचा सर्वसामान्यांना झटका, 13 दिवसांत पेट्रोल-डिझेल तब्बल ‘इतक्या’ रूपयांनी महागलं
नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia-Ukraine War) पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने चढ उतार पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत 100 डॉलर प्रतिबॅरलच्या आसपास असताना भारतात मात्र इंधनाच्या (Fuel) दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
गेल्या 15 दिवसात सर्वसामान्यांना केवळ दोन दिवस दिलासा मिळाला असून पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price) 13 वेळेस वाढ झाली आहे. जवळपास साडेचार महिने स्थिर असलेल्या पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात 22 मार्चपासून सातत्याने वाढ होत आहे. रोज वाढणाऱ्या इंधनाच्या दरामुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे.
22 मार्चपासून प्रतिलीटर पेट्रोल-डिझेलच्या दरात तब्बल 9.20 रूपयांनी वाढ झाली आहे. आज पंधराव्या दिवशी देखील पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मंगळवारी दिल्लीत (Delhi) पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 80 पैशांनी वाढ झाली आहे. तर मुंबईत (Mumbai) पेट्रोल 84 पैशांनी व डिझेल 85 पैशांनी महागलं आहे.
दरम्यान, आजच्या दरवाढीनंतर मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलचे दर 119.67 आणि प्रतिलीटर डिझेलचे दर 103.92 रूपयांवर जाऊन पोहोचले आहेत. तर राजधानी दिल्लीत प्रतिलीटर पेट्रोलसाठी 104.61 रूपये तर प्रतिलीटर डिझेलसाठी 95.87 रूपये मोजावे लागत आहेत. हे दर आज सकाळी 6 वाजल्यापासून लागू करण्यात आले आहेत.
थोडक्यात बातम्या-
“मी तुमच्या बायकोवर बोलत नाही, तुम्ही माझ्या नवऱ्याला मध्ये का आणता?”
मनसेला मोठा धक्का! मुस्लिम कार्यकर्त्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
78 वर्षांच्या आज्जीने सर्व संपत्ती राहुल गांधींना केली दान, जाणून घ्या कारण
“हे सरकार इतकं नालायक निघालं की, वेश्यांना…”
कोरोनाच्या नव्या प्रकाराने जगाची चिंता वाढवली, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा
Comments are closed.