मुंबई | रशिया-युक्रेन युद्धाचा फटका थेट आंतरराष्ट्रीय बाजाराला बसला आहे. अनेक देशांना महागाईचा सामना करावा लागत आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यात देशातील तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. (Petrol-Diesel price)
गुरूवारी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. 3 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारनं पेट्रोलवरील (Petrol) उत्पादन शुल्क 10 रूपये प्रति लिटर आणि डिझेलवरील (Diesel) उत्पादन शुल्क प्रति लिटर 5 रूपयांनी कमी केलं होतं. त्यानंतर देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) किमती स्थिर असलेल्या पाहायला मिळत आहेत.
मुंबईत प्रति लिटर पेट्रोलसाठी 109.98 रूपये तर प्रति लिटर डिझेलसाठी 94.14 रूपये मोजावे लागत आहेत. दिल्लीत पेट्रोलचे दर 95.41 रूपये प्रति लिटर आहेत. चेन्नईत पेट्रोलचे दर 101.40 रूपये प्रति लिटर तर डिझेलचे दर 91.43 रूपये प्रति लिटर इतके आहेत. तर कोलकात्यात पेट्रोल 104.67 रूपये प्रति लिटर व डिझेल 89.79 रूपये प्रति लिटर आहे.
दरम्यान, पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly Election 2022) पेट्रोल व डिझेलच्या दरात विक्रमी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, या निवडणुकांचे निकाल लागून पाच दिवस उलटले आहेत तरीही देशात पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर पाहायला मिळत आहेत.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! जो बायडन यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
होळीच्या दिवशी पांढऱ्या कपड्यांना आहे विशेष महत्त्व, जाणून घ्या या मागचं खरं कारण
रशियाला मोठा धक्का, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय
रशिया-युक्रेन युद्धावर डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
मोठी बातमी! राज्यातील शिक्षकांसाठी ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
Comments are closed.