पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ कायम, सलग सहाव्यांदा पेट्रोल महागलं; वाचा ताजे दर
मुंबई | रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia-Ukraine) पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. अनेक देश महागाईचा सामना करत असताना भारतात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात सातत्याने वाढ होत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी सलग सहा वेळा इंधनाच्या दरात वाढ केली आहे.
देशात तब्बल साडेचार महिने पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी सात दिवसात सहा वेळेस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे एकाच आठवड्यात पेट्रोलचे भाव 4.80 रूपयांनी वधारले आहेत. आज सकाळी 6 वाजल्यापासून पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू करण्यात आले आहेत.
मुंबईत (Mumbai) सोमवारी पेट्रोलच्या दरात 85 पैशांनी तर डिझेलच्या दरात 75 पैशांनी वाढ झाली आहे. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलसाठी 115.04 रूपये तर डिझेलसाठी 99.25 रूपये मोजावे लागणार आहेत. तर राजधानी दिल्लीतही (Delhi) पेट्रोलच्या किमतीने शंभरी गाठली आहे. दिल्लीत प्रतिलीटर पेट्रोलसाठी 100.21 रूपये आणि प्रतिलीटर डिझेलसाठी 91.47 रूपये मोजावे लागणार आहेत.
दरम्यान, पाच राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साडेचार महिने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्यानंतर 22 मार्चपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सहा वेळेस वाढ करण्यात आली आहे. सतत होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र लागली आहे.
थोडक्यात बातम्या-
ipl 2022: हार्दिकची गुजरात टीम राहुलच्या लखनौवर भारी, रंजक सामन्यात गुजरातचा दणदणीत विजय
पैसा वसूल शेअर! वर्षभरात तब्बल 184 टक्क्यांनी वाढला ‘या’ कंपनीचा शेअर
“…अन् राष्ट्रवादीचा सदस्य आमच्या छातीवर नाचतो”; शिवसेना आमदाराचं वक्तव्य
मोठी बातमी! ठाकरे सरकारच्या दोन मंत्र्यांवर मुंबईत गुन्हा दाखल
तालिबानचा नवा फतवा! आता महिला-पुरूषांना उद्यानात सोबत फिरण्यास बंदी
Comments are closed.