मुंबई | जागतिक बाजार पेठेतखनिज तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीचा फायदा पेट्रोलियम कंपन्यांना होणार आहे. खनिज तेलातील स्वस्ताई आणि डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यास पेट्रोल आणि डिझेल 5 ते 6 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खनिज तेलातील स्वस्ताई आणि डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यास मुंबईत पेट्रोलचा भाव 70 रुपयांखाली येऊ शकतो. ग्राहकांसाठी ही आनंदाची बाब असेल.
जागतिक बाजरपेठला खनिज तेलाचा पुरवठा करणारे ओपेक देश, रशिया आणि सौदी अरेबिया या तिघांमध्ये खनिज तेलाच्या उत्पादनावरून वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे सोमवारी खनिज तेलाचा भाव तब्बल 30टक्क्यांनी कोसळला होता.
खनिज तेल 35 डॉलर प्रती बॅरल एवढ्या नीचांकी पातळीवर आले आहे. या घसरणीचे भारतात तात्काळ परिणाम दिसून आले नसले तरी येत्या काही दिवसांत कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करतील, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“आदित्यसाहेबांना खासदारकीसाठी मी नाही आवडलो त्यांची चॉईस त्या बाईला”
कोरोनाबद्दल सर्वकाही; IMA कडून महत्त्वाची माहिती जारी
महत्त्वाच्या बातम्या-
आंबेडकरांच्या ग्रंथाचा दाखला देत ओबींसीची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे; कोल्हेंची मागणी
मुलांच्या वार्षिक परीक्षांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण
कोरोनाच्या कचाट्यातून क्रिकेटही सुटलं नाही; भारत-आफ्रिका वनडे मालिका रद्द
Comments are closed.