Top News देश

पेट्रोल-डिझेल दर वाढीबाबत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला मोठा खुलासा!

Photo Credit - Twitter/ @dpradhanbjp

नवी दिल्ली | शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रतिलिटर विकले जात आहे. पेट्रोल आणि डिझेल किंमतीबाबत बरीच ओरड सुरु आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वाढत्या दरबाबत भाष्य केलं आहे. तेल उत्पादक देशांनी उत्पादन कमी केले आहे. त्यामुळे तेल आयात करणाऱ्या देशांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. भारत आपल्या गरजेच्या 80 टक्के तेल आयात करतो. भारत कच्च्या तेलाच्या आयातीत तिसरा मोठा देश आहे.

आम्ही OPEC आणि OPEC Plus यांच्याशी सतत संपर्कात आहेत. आम्ही त्यांना आवाहन करीत आहोत की, किंमती वाढवू नये. येत्या काळात यात बदल होणार आहे. कोरोनामुळे सरकारचे बजेट लक्षणीय वाढले आहे. आर्थिक सुधारणांना गती देण्यासाठी सरकारने गुंतवणुकीत वाढ केली असून, भांडवली निधितही 35 टक्के वाढ केली आहे, ते ‘एएनआय’शी बोलत होते.

सरकारला खर्च करण्यासाठी पैशांची गरज आहे म्हणूनच ते कर वसूूल करतात. केंद्र आणि राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलवर कर आकारतात. राज्य सरकारही खर्च वाढवित आहे, त्यामुळे राज्य सरकारला अधिक कराची गरज आहे. अर्थमंत्री यावर तोडगा काढतील, अशी आशा धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, निर्मला सितारामण यांनी चेन्नई येथे आयोजित केलेेल्या कार्यक्रमात बोलताना पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराबाबत चिंता व्यक्त केली होती. मी स्वत: पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराबाबत धार्मिक संकटात आहे. ही एक अशी परिस्थिती आहे, जिकडे प्रत्येकाला किंमत कधी कमी होईल याचं उत्तर हवं आहे. सध्या पेट्रोलच्या किंमतीत 60 टक्के आणि डिझेलच्या किंमतीत 54 टक्के कर आहे. ज्यामध्ये केंद्र आणि राज्य यांचा वाटा आहे, असंही निर्माला सितारामण यावेळी म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या –

…म्हणून ‘या’ वकिलानं स्वत:च्या रक्तानं लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, पाहा व्हिडीओ

…पण माझ्या शेतकऱ्यांसाठी मोदींचे अश्रू निघत नाहीत- सुप्रिया सुळे

‘या’ मुलाचा व्हिडीओ पाहून शंकर महादेवन म्हणाले…’एकदा तरी त्याला भेटण्याची संधी मिळो’

धनंजय महाडिकांच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा; शरद पवार, फडणवीस होते हजर

“राममंदिरासाठी चंदा वसुली करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव खाली आणा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या