बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पीएफ खातेदारांनो तात्काळ ‘हे’ काम करा, अन्यथा होईल मोठं नुकसान

नवी दिल्ली | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खातेदारांना नॉमिनी करणं सुद्धा आवश्यक आहे. EPF आणि EPS च्या बाबतीतही नामांकन केलं पाहिजे जेणेकरून EPFO ​​सदस्याचा अकाली मृत्यू झाल्यास हा निधी नामनिर्देशित व्यक्तीला वेळेत उपलब्ध होऊ शकेल.

नॉमिनीचं नाव नोंदवण्याची प्रक्रिया तुम्ही ऑनलाईनही करू शकता. यासाठी तुम्हाला ईपीएफओच्या वेबसाईटवर जावं लागणार आहे. या ठिकाणी गेल्यानंतर सर्व्हिसेज हा पर्याय निवडून, त्यात ‘फॉर एम्प्लॉईज’ वर क्लिक करा. यानंतर मेंबर य़ूएएन किंवा ऑनलाईन सर्व्हिस या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा यूएन नंबर आणि पासवर्ड वापरुन लॉग इन करावं लागेल.

लॉग इन केल्यानंतर मॅनेज या टॅबमध्ये जाऊन ‘ई-नॉमिनेशन’ हा पर्याय निवडा. यानंतर प्रोव्हाईड डिटेल्स टॅब दिसेल, यात ‘सेव्ह’ या पर्यायावर क्लिक करा. फॅमिली डिक्लेरेशन अपडेट करण्यासाठी ‘येस’ हा पर्याय निवडा. यानंतर ‘ॲड फॅमिली डिटेल्स’ या पर्यायावर क्लिक करुन तुम्ही नॉमिनींची नोंदणी करू शकता.

तुम्ही एकाहून अधिक नॉमिनीज निवडू शकता. तसेच, तुमच्या खात्यातील रकमेचा कोणाला किती भाग मिळेल हेदेखील तुम्ही ठरवू शकता. यासाठी तुम्हाला ‘नॉमिनेशन डिटेल्स’ या पर्यायावर क्लिक करावं लागेल. यानंतर तुम्हाला ओटीपीचा पर्याय येईल. ओटीपी टाकल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल. अशा प्रकारे आपल्या ईपीएफ किंवा ईपीएस खात्यामध्ये नॉमिनीचं नाव जोडू शकता.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! एकनाथ खडसे बॉम्बे रूग्णालयात दाखल

कोरोनाचा कहर! आणखी एक नवा व्हेरिएंट आला समोर

खुशखबर! पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता ‘या’ तारखेला मिळणार

एक ही तो दिल है, कितनी बार जितोगे, नीरजकडून ऑलिम्पिक पदक मिल्खा सिंग यांना समर्पित!

“जाऊ तिथं खाऊ असं महाविकास आघाडी सरकारचं काम”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More