बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेशी पंगा नंतर फोन, आता थेट भेट; अमित शहा आणि राणेंमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

नवी दिल्ली | महाराष्ट्रातील जनआशीर्वाद यात्रे दरम्यान झालेल्या राजकीय नाट्यानंतर आज भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे. ठाकरे सरकारने राणेंवर अटकेची कारवाईही केली होती. त्या पार्श्वभूमीवर ही भेट होत असल्याचं बोललं जात आहे.

जनआशीर्वाद यात्रेवेळी राणेंची अटक आणि जामीनानंतर केंद्रातील भाजप नेत्यांनी त्यांची फोनवरुन विचारपूस केली होती. त्यात अमित शहा यांचाही समावेश होता. यावेळी अमित शाह यांनी नारायण राणे यांची विचारपूस केली होती.

पोलीस कारवाई आणि अटकेचा कारवाईबाबतचे तपशीलही अमित शहा यांनी नारायण राणे यांना विचारल्याचं समजतं. भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी ही माहिती दिली होती.

नवनिर्वाचित केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्रात जनआशीर्वाद यात्रा काढली होती. त्यात केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा समावेश होता. या चौघांपैकी नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा चांगलीच चर्चेत राहिली. कारण राणे यांनी या यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांबाबत एक वक्तव्य केलं.

थोडक्यात बातम्या- 

‘या’ कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी; वैज्ञानिकांचा दावा

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

“बिग बॉस’चा आवाज पुरुषाचाच असल्यामुळे…’; बेधडक तृप्ती देसाईंचा गौप्यस्फोट

कोरोना अपडेट! मुंबईच्या आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

राज्याच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार, जाणून घ्या आजची आकडेवारी!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More