बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आजोबा अरुण गवळीचा नातीला खेळवताना फोटो व्हायरल!

मुंबई | अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. योगिता ही अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची मुलगी आहे. आता आजोबा अरुण गवळींनी नुकतीच नातीची भेट घेतली आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अक्षय वाघमारेने इन्स्टाग्रामवर आजोबा-नातीच्या भेटीचा हा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोने सोशल मीडियावर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.  या फोटोमध्ये अरुण गवळी नातीला त्यांच्या मांडीवर घेऊन तिच्याकडे पाहून हसत असल्याचं दिसत आहे. नातीला भेटण्याचा एक वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे. ‘जेव्हा रहस्य गुंतलेली असतात तेव्हाच आकर्षणे तीव्र असतात’, असं कॅप्शन अक्षयने या फोटोला दिलं आहे.नातीला भेटून डॅडींना फारच आनंद झाल्याचं दिसत आहे. सोबत त्यांची पत्नी देखील होती.

अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांनी गेल्या वर्षी 8 मे रोजी लग्नगाठ बांधली होती. लग्नाला वर्ष होताच दोघांनी एक आनंदाची बातमी दिली आहे. अक्षय आणि योगिताला कन्यारत्न प्राप्त झालं.

दरम्यान, बाबा झाल्यावर प्रतिक्रिया देताना अक्षयच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता, या बाबत बोलताना तो म्हणाला, ‘मला इतका आनंद झाला आहे की तो मी शब्दात मांडू शकता नाही. एक बाबा म्हणून मी माझा प्रवास सुरु करणार आहे आणि त्यासाठी मी खूपच उत्सुक आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Waghmare (@akshayswaghmare)

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परिक्षांच्या निकालाची तारीख जाहीर

आनंदाची बातमी! पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट लहान मुलांना ‘या’ महिन्यात लस देण्यासाठी तयार

“या देशात लोकशाही आहे, दंडुकेशाही चालणार नाही”

आश्चर्यकारक! मेलेल्या मुलाला कवटाळून आईचा आक्रोश अन् क्षणातच….

‘या’ ठिकाणी मातीत सापडत आहेत हिरे; हिरे शोधायला हजारो लोकांची गर्दी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More