बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पिक्चर अभी बाकी है कारण मी अजून पिक्चरमध्ये नाहीये”

मुंबई | ड्रग्ज प्रकरणात अटक असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची अखेर आर्थर रोड कारागृहातून सुटका झालेली आहे. त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’, असं म्हणत सुचक इशारा दिला होता. त्यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मिश्किल टिपण्णी केली आहे.

नवाब मलिक सात्त्याने आरोपांच्या फेऱ्या झाडताना दिसत असतानाच समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर आणि वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. त्यावेळी रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेऊन वानखेडे कुटुंबीयांचं समर्थन केलं आहे.

आज क्रांती रेडकर मला भेटायला आल्या. त्या एक अभिनेत्री आहेत. त्या चित्रपटात काम करतात, आता मला देखील वाटतंय की मी पण चित्रपटात काम करावं. मलिक म्हणतात, पिक्चर अभी बाकी है. ते असं म्हणतात कारण मी पिक्चरमध्ये अजून नाही. त्यामुळे पिक्चरमधील नावं बदलण्याचा विषयच नाहीये, असंही मिश्किल टिपण्णी त्यांनी यावेळी केली आहे.

दरम्यान, नवाब मलिक राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदाचा फायदा घेऊन वानखेडे कुटुंबीयांची बदनामी करत आहे. समीर वानखेडे मुस्लीम नाही. त्यांनी सर्व कागदपत्रे मला दाखवली आहेत. समीर वानखेडे आणि त्याचं संपुर्ण कुटूंब हे हिंदूच आहे. नवाब मलिक यांचे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘…त्यासाठी तुम्ही मला खिशात टाकाच’; मलिकाचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

‘…तर जगाला गंभीर परिणाम भोगावे लागतील’; तालिबानची थेट अमेरिकेला धमकी

“मी अधिवेशनात पोलखोल करणार, भाजपचे नेते तोंड लपवून पळतील”

राज्यात हुडहुडी वाढली! स्वेटर, कानटोप्या, जॅकेट बाहेर काढा

व्हायोलिनचा ‘स्वराधीन’ हरपला! ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांचे निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More