बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ते’ वक्तव्य संजय राऊतांच्या अंगलट येणार?, न्यायालयात याचिका दाखल

मुंबई | ईडीकडून (ED) सातत्याने महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांवर कारवाई केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच आक्रमक झाले होते. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर संजय राऊतांनी न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सडकून टीका केली होती.

संजय राऊतांनी न्यायव्यवस्थेवर केलेलं वक्तव्य त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. न्यायव्यवस्थेचा अवमान केल्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात जनहीत याचिका (PIL) दाखल करण्यात आली आहे. इंडियन बार असोसिएशनने संजय राऊतांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे.

न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतरही संजय राऊत त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. काही ठराविक पक्षांच्या लोकांनाच न्यायालयाकडून दिलासा मिळतो, असा पुनरूच्चार संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, संजय राऊत सातत्याने न्यायव्यवस्थेवर वारंवार शंका उपस्थित करत असल्याचं या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. तर मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे आता या याचिकेवर सुनावणी कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“मंत्री धनंजय मुंडे म्हणजे राष्ट्रवादीची बॉबी डार्लिंग”

धनंजय मुंडेंकडून राज ठाकरेंचा अर्धवटराव म्हणून उल्लेख, म्हणाले…

मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंबाबत सरकारी वकिलांनी दिली धक्कादायक माहिती

“पक्षप्रमुख आदेश देतील आणि ईट का जवाब पत्थरसे दिया जायेगा”

महाराष्ट्रात पुन्हा मास्कसक्ती?, केंद्राने राज्यांना दिल्या ‘या’ सूचना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More