व्हॉट्सअॅपवरील खोट्या मेसेजमुळे अंध दाम्पत्याला मनस्ताप

पुणे | व्हॉट्सअॅपवरील एका मेसेजमुळे पिंपरीतील अंध दाम्पत्याला मनस्ताप सहन करावा लागत आहे. धर्मेंद्र आणि शीतल लोखंडे असं या दाम्पत्याचं नाव आहे.

‘फोटोमधील लहान मुलगी ही पिंपरीतल्या अजमेरा, मासुळकर कॉलनी येथे दिसली आहे. भिकारी म्हणतात, ती मुलगी आमची आहे. पण हे पटण्यासारखं नाही. हा फोटो इतर ग्रुपमध्ये पाठवा… काय माहिती, कोणाची चिमुरडी पुन्हा त्यांना भेटेल, असा धादांत खोटा मेसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालाय.

19989076 968368016636460 884657170 n - व्हॉट्सअॅपवरील खोट्या मेसेजमुळे अंध दाम्पत्याला मनस्ताप

 

दरम्यान, ही मुलगी या दाम्पत्याची असल्याची माहिती त्यांच्या शेजारी राहणारे राशीद सय्यद यांनी ‘थोडक्यात’ला दिली. सोबतच या मुलीचं बर्थ सर्टिफिकेटही त्यांनी ‘थोडक्यात’ला पाठवलं. त्यामुळे मेसेजची खात्री न करता तो पुढे पाठवण्यापूर्वी त्याची खातरजमा करणे गरजेचं असल्याचं यानिमित्तानं पुन्हा समोर आलंय.

19987561 968367426636519 1903772264 n 1 227x300 - व्हॉट्सअॅपवरील खोट्या मेसेजमुळे अंध दाम्पत्याला मनस्ताप

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या