पुणे महाराष्ट्र

आनंदाची बातमी… पुण्यात पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी, पुणेकरांना दिलासा!

पुणे |  राज्याचा कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना पुण्यातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईनंतर आता पुण्यात देखील प्लाझ्मा  थेरपीला यश मिळालं आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

प्लाझ्मा थेरपीमुळे उच्च रक्तदाब आणि अतिस्थूलपणा असलेली कोरोनाबाधित व्यक्ती ठणठणीत बरी झाली आहे. 11 आणि 11 मे या दिवशी थेरपी केलेल्या रुग्णाला आता कोविड वॉर्डमधून हलवण्यात आले आहे, अशा आनंदाची वर्ता मोहोळ यांनी दिलेला आहे. यामुळे पुणेकरांना दिलासा मिळालेला आहे.

प्लाझ्मा थेपरी म्हणजे काय???- कोरोतून पूर्णपणे सावरलेला व्यक्ती त्याच्या शरीरात रोगप्रतिकारक क्षमता वाढवणाऱ्या पेशी तयार झालेल्या असतात त्या पेशी सध्या कोरोनाने ग्रासलेल्या रूग्णांच्या शरीरात टाकल्या जातात. त्यामुळे कोरोनाग्रस्ताची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते आणि याने कोरोनाबाधित लवकरात लवकर बरा होण्याची शक्यता अधिक असते, या सगळ्या प्रकाराला प्लाझ्मा थेरपी असं म्हणतात.

प्लाझ्मा थेरपीमुळे रिकव्हरी रेट म्हणजे रूग्ण ठणठणीत बरा होण्याचा दर वाढू शकतो, ही खूप दिलासादायक बाब आहे. प्लाझ्मा थेरपी ही सर्वप्रथम अमेरिकेत पार पडली होती. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी केरळ नंतर दिल्ली आणि मुंबई तसंच आता आता पुण्यात देखील प्लाझ्मा थेरपीला यश मिळालं आहे. कोरोनाला संपवण्यासाठी प्लाझ्मा थेरपी ही खूप उपयोगी ठरणार आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

विधानपरिषदेत अमोल मिटकरी त्यांच्या कामाचा ठसा उमटवतील- प्रवीण गायकवाड

पाहा, आज पुण्यात किती रूग्ण वाढले अन् किती रूग्णांना डिस्चार्ज मिळाला…

महत्वाच्या बातम्या-

राज्यात कोरोनावर मात करण्याचा उच्चांक, एकाच दिवसात बरे झाले 1408 रूग्ण…!

डोमकावळ्यांची फडफड औटघटकेची ठरेल; संजय राऊतांची अग्रलेखातून सडकून टीका

मुंबईतील कोरोनाची स्थिती ठाकरे सरकारच्या हाताबाहेर गेल्याचं चित्र- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या