बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चाहत्यांना सुखद धक्का! अभिनेत्री यामी गौतम अडकली विवाहबंधनात

मुंबई | बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री यामी गौतम हिनं गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. यामी गौतमनं लेखक आणि दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्नगाठ बांधली. यामीनं स्वत: सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्या लग्नाची बातमी चाहत्यांना दिली. या दोघांनी आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

यामी आणि आदित्यने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नातील एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये यामी आणि आदित्य एकमेकांकडे प्रेमाने बघताना दिसत आहे. या फोटोमध्ये तिनं लाल रंगाची साडी नेसली असून ती अतिशय सुंदर दिसत आहे. तर आदित्यनं सफेद रंगाची शेरवानी परिधान केली आहे.

यामीने हा फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, ‘आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आशिर्वादानं आम्ही लग्नबंधनात अडकलो आहोत. आम्ही सर्वजण खासगीपणा जपणारे असल्यानं जवळच्या आणि मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये हा लग्न सोहळा पार पाडला आहे. प्रेम आणि मैत्रीपूर्ण नात्याने एका नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. आमच्या या प्रवासासाठी तुमच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद हवे आहेत. तुमचे यामी आणि आदित्य’

दरम्यान, आदित्यनं उरी – द सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता त्यानं यामीशी लग्न केलं आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणा-या आदित्यचाही चाहतावर्ग मोठा आहे. त्याच्या पहिल्याच चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Yami Gautam (@yamigautam)

थोडक्यात बातम्या – 

प्रीवेडिंगवाल्यांना त्रास देऊ नका, ते हनिमूनलासुद्धा इथेच आले पाहिजेत- अजित पवार

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत व्यापाऱ्याला तब्बल ‘एवढ्या’ लाख रुपयांचा गंडा

…नाहीतर पुणे जिल्ह्यात काय करायचं आम्ही पाहू; संजय राऊतांचे राष्ट्रवादीला खुले आव्हान

‘एम्स’च्या अभ्यासातून मोठा दिलासा! लसीकरणानंतर पुन्हा कोरोना झाल्यास…..

माणसांनंतर प्राण्यांनाही कोरोनाचं ग्रहण! कोरोनाने देशातील पहिला ‘या’ प्राण्याचा मृत्यु

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More