Top News देश

आपल्याला कोरोनाला हरवायचंय… आर्थिक मदत करा; पंतप्रधान मोदींचं आवाहन

Loading...

नवी दिल्ली |  जगभरात कोरोनाने धूमाकूळ घातलाय. भारतातही कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढू लागला आहे. शासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र आपल्याला कोरोनाचा जिकीरीने सामना करायचाय. यासाठी तुमच्या मदतीची आवश्यकता आहे, असं म्हणत मोदींनी भारतवासियांना आर्थिक मदतीचं आवाहन केलं आहे. त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

भारताची कोरोनाशी लढाई सुरू असून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत देशातील सर्व वर्गातील लोकांनी आर्थिक मदत देण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्यामुळे जनतेतून आलेल्या या आर्थिक मदतीचा उपयोग अडचणींवर मात करण्यासाठी होईल, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी जनतेला आर्थिक मदतीचं आवाहन केलं आहे.

देशातील जनतेला माझं आवाहन आहे की देशातील जनतेने पीएम-केअर्स फंडात आर्थिक योगदान द्यावं. या फंडाचा उपयोग पुढील अडचणीच्या काळावर मात करण्यासाठी करतायेईल, असे नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

पंतप्रधानांच्या पीएम-केअर्स फंडात कितीही रूपयांचं योगदान स्वीकारलं जाईल, असंही मोदींनी सांगितलं आहे. त्याचबरोबर जमा झालेल्या आर्थिक ताकदीच्या बळावर देशाच्या आपत्कालिन परिस्थितीशी लढण्याच्या क्षमतेत मोठी वाढ होणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

 

Loading...

 

ट्रेंडिंग बातम्या-

‘या’ त्रिसूत्रीनुसार कोरोनावर प्रतिबंध करण्यात येत आहे- आरोग्यमंत्री

गरज पडल्यास संपूर्ण राज्यात “सरकारी कर्फ्यू” जाहीर करावा- मनसे

महत्वाच्या बातम्या-

देशसेवेची हीच वेळ… दानशूर रतन टाटांनी केली 500 कोटींची मदत

नारीला सलाम…. प्रथम कोरोना तपासणीचं किट बनवलं अन् नंतर बाळाला जन्म दिला!

“आमच्यावर उपासमारीची वेळ आलीये, मुख्यमंत्रीसाहेब आमच्याकडेही लक्ष द्या”

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या