नवी दिल्ली | गेले नऊ महिने जगाला दहशतीखाली ठेवणाऱ्या कोरोना व्हायरसवर लस आली आहे. या बहुप्रतीक्षित कोरोना लसीचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केलं.
आपले डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, आरोग्य सेवेतील कर्मचारी यांना सगळ्यात आधी लस दिली जाईल. या सगळ्यांचा कोरोना लसीवर पहिला हक्क असल्याचं मोदी म्हणाले.
काही वेळात देशात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू होत आहे. यासाठी मी देशवासीयांचं अभिनंदन करतो. ज्याला सगळ्यात जास्त गरज आहे, त्याला सगळ्यात आधी कोरोना लस मिळेल, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये एका महिन्याचं अंतर असेल. दुसरा डोस घेतल्यानंतर 2 आठवड्यांनी आपल्या शरीरात करोना प्रतिबंधात्मक शक्ती निर्माण होईल, असंही मोदींनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
“भाषा नीट करा नाहीतर हा निलेश राणे तुमची घमंड उतरवल्याशिवाय राहणार नाही”
लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर मनसेनी केली मुख्यमंत्र्यांकडं ‘ही’ मागणी
…त्यावेळी ‘ओ साला धनंजय मुंडे’ म्हणत शिवीगाळ करणारे मनीष धुरी आज त्यांच्या पाठीशी- रेणू शर्मा
धक्कादायक!!! प्रेयसीची हत्या करुन तिचा मृतदेह फ्लॅटच्या भिंतीत लपवला
पंतप्रधान शेतकऱ्यांचा आदर करत नाहीत- राहुल गांधी
आपलं कोणी काही करू शकत नाही, अशा भ्रमात राहू नका- अण्णा हजारे