देशात पुन्हा एकदा विकास जिंकलाय- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | देशात पुन्हा एकदा विकास जिंकलाय, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलीय. उत्तर प्रदेशातील पालिका निवडणुकांमध्ये जनतेनं भाजपच्या बाजूने कौल दिल्यानं पंतप्रधान मोदींनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली.

पंतप्रधान मोदींनी विजयाचं श्रेय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजप कार्यकर्त्यांना दिलंय. त्याचबरोबर जनतेनं कौल दिल्यानं जोमानं कामाला सुरूवात करायची आहे, असंही सांगितलं.

केंद्रातील नेतृत्व आणि उत्तर प्रदेशमधील भाजपचं धोरण यामुळे विजय शक्य झाला, अशी प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिली.