देश

मी अपयशी, तर मग महाभेसळीची गरज काय?- नरेंद्र मोदी

चेन्नई | जर केंद्रातील सरकार अपयशी आहे तर मग विरोधकांना महाभेसळीची काय गरज आहे, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना केला आहे. तनिळनाडूमधील पेरुमनाल्लुरमध्ये ते बोलत होते. 

विरोधक मोदी अयशस्वी असल्याचं सांगत आहे पण मग सर्व विरोधकांना एकत्रितपणे येऊन निवडणूक लढण्याची गरज काय?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

ही महाभेसळ स्वत:च्या फायद्यासाठी काही श्रीमंतांनी केलेली युती आहे, असं म्हणतं मोदींनी तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि डीएमकेवर शरसंधान साधलं आहे. 

दरम्यान, काँग्रेसला देशाच्या भल्यासाठी राफेल करार होऊ द्यायचा नाही. मोदी सरकारमध्ये भ्रष्टाचाराला अजिबात थारा नाही, असं त्यांनी विरोधकांना सुनावलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

काँग्रेस कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व जल्लोष… “आ गई राहुल संग प्रियांका गांधी….!” पाहा व्हीडिओ

आगामी निवडणुकांच्या तोंडावर राज कार्यकर्त्यांशी साधतायत कृष्णकुंजवर ‘मनसे’ संवाद!

प्रियांकांच्या लखनौमधील रोड शोला सुरूवात, रॅलीत पाय ठेवायलाही जागा नाही!

प्रियांका गांधींची ट्विटरवर एन्ट्री; फॉलोअर्सचा तुफान प्रतिसाद

निवडणुकीआधीच ‘त्या’ 43 व्या जागेवर मुख्यमंत्री-पवार येणार आमने-सामने!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या