बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुळे जगाने योगाला पूर्वीपेक्षा अधिक गांभीर्यानं घेतलं- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | कोरोनासारख्या महामारीच्या संकटात जग योगाला अधिक गांभीर्यानं घेत आहे. योगामुळे आपलं मानसिक व शारीरिक आरोग्य अधिक सुदृढ बनतं. त्यामुळे प्रत्येकानं व्यायाम करण्याबरोबरच योगालाही आयुष्याचं भाग बनवावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

आज सगळे कुटुंबासोबत योग करत आहे. योगाच्या माध्यमातून सगळे एकत्र येतात, तेव्हा संपूर्ण घरात ऊर्जेचा संचार होता. कौटुंबिक बंध वाढवण्याचाही हा दिवस आहे. योगाची अनेक आसनं आहेत. जी आपल्या शरीराची शक्ती वाढवतात, असं मोदींनी सांगितलं आहे.

कोरोना विषाणू आपल्या श्वसन संस्थेवर हल्ला करतो. श्वसन संस्था अधिक सक्षम करण्यासाठी योगाची मोठी मदत होते. यासाठी अनुलोम विनुलोम प्राणायम आहे. प्राणायमाचे असंख्य प्रकार आहेत. योगाची ही आसनं श्वसन संस्था मजबूत करण्यासाठी मदत करते, असंही मोदींनी म्हटलंय.

प्रत्येकानं प्राणायमाचा दैनंदिन आयुष्याचा भाग बनवावं. कोरोना झालेल्या लोकांनाही यातून बाहेर पडण्यासाठी ताकद मिळत आहे. योगामुळे मानसिक शांती मिळते. संयम आणि सहनशक्तीही मिळते, असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

“…तेव्हा फडणवीसांच्या बंगल्यात थांबून थोरात काय करत होते?”

चीन भारतावर सायबर हल्ला करण्याच्या तयारीत, अशी करा स्वतःची सुरक्षा!

महत्वाच्या बातम्या-

“घरात घुसून मारू म्हणत सत्तेत आलेली व्यक्ती म्हणते, घरात कुणी घुसलंच नाही”

सुशांत दर 2 वर्षांनी मॅनेजर टीम बदलायचा; या प्रकरणी आतापर्यंत 16 जणांचे जबाब

यंदाच्या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण; पाहा कोणत्या शहरात किती वाजता दिसणार?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More