नवी दिल्ली | जनता, शासन आणि प्रशासन यांनी नऊ दिवस लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद दिला आहे. जनता कर्फ्यूला थाळीनाद करून मानलेले आभार इतर देशांसाठी प्रेरणादायी ठरले असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. तिसऱ्यांदा ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांशी संवाद साधत आहेत.
ही मोठी लढाई मी एकटा कसा लढणार, किती दिवस असे घालवायचे हा प्रश्न तुम्हाला पडत असेल, पण आपण एकटे नाही, १३० कोटी देशवासीयांची सामूहिक शक्ती प्रत्येकाच्या सोबत आहे त्यामुळे काळजीचं कोणतंही कारण नाही, असं मोदी म्हमाले.
कोरोनाच्या अंधाराला दूर करण्यासाठी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता घरातल्या सगळ्या लाईट बंद करा आणि घराच्या दरावाजासमोर किंवा बाल्कनीत उभा राहून 9 मिनिटे मेणबत्ती किंवा मोबाईल फ्लॅशलाईट जाळा, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. यावेळी अजिबात गर्दी होणार नाही किंबहुना सोशल डिस्टन्सिंग पाळा, असं सांगायला ते विसरले नाहीत.
अंधकार दूर करण्यासाठी प्रकाशाचं तेज सर्वत्र पोहोचवायचं आहे. कोरोनाच्या संकटाच्या अंधकाराला आव्हान द्यायचं आहे. प्रशाच्या उर्जेची अनूभुती या कोरोनामय अंधकाराला द्यायची आहे, असं मोदी म्हणाले.
ट्रेंडिंग बातम्या-
‘मरण्यासाठी मशिदीपेक्षा चांगली जागा नाही’ असं म्हणणारे मौलाना साद आता म्हणतात…
दिल्लीसारखा महाराष्ट्रातही होणार होता तबलिगीचा कार्यक्रम; गृह विभागाच्या सतर्कतेनं धोका टळला
महत्वाच्या बातम्या-
ज्या डॉक्टरांसाठी टाळ्या आणि थाळ्या वाजवल्या त्यांच्यावरच हल्ला करण्यासारखं काय झालं?- अमोल कोल्हे
एवढं बेजबाबदार वागल्यावर आपल्याला स्वत:ची लाज वाटायला पाहिजे; आदिनाथ कोठारे भडकला
सावधान! पुण्यात कोरोनाचा दुसरा बळी, परदेशात प्रवास न केलेल्या महिलेचा मृत्यू
Comments are closed.