शरद पवारांच्या तब्येतीची मोदींनाही काळजी; फोन करत केली विचारपूस
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखी आणि पित्ताशयाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी शरद पवारांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. अनेक नेत्यांनी ट्विट करत शरद पवारांच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे.
भाजप नेत्यांनीही पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शरद पवार यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी फोन केल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवारांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. नरेंद्र मोदींनी सोमवारी आपल्या तब्येतीची विचारपूस केल्याचं पवारांनी सांगितलं आहे.
पवारांना पित्ताशयाचा त्रास जास्त जाणवत असल्यामुळे त्यांच्यावर बुधवारी 31 मार्च रोजी शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती आहे. यामुळे शरद पवारांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
शरद पवार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांच्या प्रचारासाठी जाणार होते. पण आता प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना दौरा रद्द करावा लागला आहे. नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली. वैद्यकीय तपासणीनंतर सध्या कुठलीही औषधे न घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी पवार यांना दिल्याचं कळतंय.
Thank you Honourable Prime Minister Shri @narendramodi ji for your good wishes for my speedy recovery!@PMOIndia
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2021
थोडक्यात बातम्या-
नांदेडमध्ये तलवारी उगारत शीख समुदयानं काढली जंगी मिरवणूक; पाहा व्हिडीओ
विनामास्क फिरणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी दिली अजब शिक्षा, पाहा व्हिडीओ
शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याला कोरोनाची लागण!
‘…तर मग लॉकडाऊन कराच’; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर हरभजनसिंग आक्रमक
‘उद्धवजी, समस्या ही आहे की…’; लॉकडाऊनवरून आनंद महिंद्रांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.