“दिवस-रात्र मेहनत करणारा पंतप्रधान हवा की कधीही सुट्ट्या घेणारा पंतप्रधान हवा?”

नवी दिल्ली |  दिवस-रात्र मेहनत करणारा, कष्ट घेणारा प्रधानसेवक हवा की कधीही सुट्ट्या घेणारा प्रधानसेवक हवा, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. रामलिला मैदानात भाजपच्या भरलेल्या अधिवेशनात ते बोलत होत.

साम्राज्य आणि संविधान यामधील ही लढाई आहे. जनतेला ठरवायचं आहे की त्यांना कसा प्रधानसेवक हवा आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना मला हर प्रकारे सतावण्याचा प्रयत्न झाला, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, काँग्रेसच्या काळात अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे बाहेर आले. मात्र, सरकार भ्रष्टाचाराशिवाय चालू शकतं हे भाजपनं सिद्ध केलं आहे, असं मोदी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-‘हिटमॅन’ रोहीत शर्माचं धमाकेदार शतक

-चौकीदार आता एकालाही सोडणार नाही- नरेंद्र मोदी

-पंड्या- राहूलला ‘कॉफी’ महागात, आगामी विश्वचषक स्पर्धेला मुकणार?

-सरदार पटेल पहिले पंतप्रधान असते तर देशाचं चित्र वेगळं असतं- नरेंद्र मोदी

-साहित्यिकांनी झुंडशाहीसमोर झुकणं योग्य नाही- अरुणा ढेरे

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या