नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेवर किती खर्च होतो याबाबतचा प्रश्न लोकसभेत विचारण्यात आला होता. या प्रश्नाला गृहमंत्रालयाकडून लेखी उत्तर देण्यात आलं आहे. मोदींच्या एक दिवसाच्या सुरक्षेसाठी चक्क 1 कोटी 62 लाख रुपये खर्च येत असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे.
स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजे एसपीजीच्या सुरक्षेसंदर्भातील कायद्यात मागिल वर्षी बदल करण्यात आला होता. त्यामुळे आता फक्त पंतप्रधान मोदी यांना एसपीजी सुरक्षा मिळत आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेत मोदींच्या सुरक्षेवरील खर्चाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता.
डीएमके पक्षाचे नेते दयानिधी मारन यांनी लोकसभेत पंतप्रधान मोदी यांना देण्यात येणाऱ्या एसपीजीच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न विचारला होता. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजे एसपीजी अंतर्गत सुरक्षा देण्यात येणाऱ्या व्यक्तींची मागिती त्यांनी मागवली होती.
दरम्यान, देशामध्ये एसपीजीचे 3 हजार विशेष जवान आहेत. अर्थसंकल्पामध्ये या दलासाठी 592 कोटी 55 लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
शरद पवारांची सुरक्षा काढणं सुडबुद्धीनं घेतलेला निर्णय- रोहित पवार
शरद पवारांच्या घरातील सुरक्षा व्यवस्था मोदी सरकारने हटवली
महत्वाच्या बातम्या-
“छ. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात लालसी सरकारने आमच्या भगिनींची सुरक्षा वाऱ्यावर सोडली”
“माझ्याभोवती माता-भगिनींचं सुरक्षा कवच; लाठ्यांचा काहीही परिणाम होणार नाही”
शरद पवारांच्या निवासस्थानाची सुरक्षा काढली नाही- दिल्ली पोलीस
Comments are closed.