पुणे | वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पुढील 7 दिवस अनेक निर्बंध लावण्यात आले आहे. पुण्यात संध्याकाळी 6 वाजल्यापासून सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच पुण्यात पुढील सात दिवस PMPML बससेवा बंद करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आढावा बैठक घेतली यात हा निर्णय घेण्यात आला आहे. पीएमपीएल बससेवा ही पुण्याची लाईफलाइन मानली जाते. परंतू शासनाकडून वाढत्या कोरोना प्रार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्व हॉटेल, बार, रेस्टॉरंट सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मॉल, सिनेमा हॉल, धार्मिक स्थळ, सार्वजनिक बस वाहतूक पुढचे सात दिवस पूर्ण बंद असणार आहेत. लग्न, आणि अंत्यसंस्कार सोडून कोणतेही सामाजिक, राजकिय कार्यक्रम होणार नाहीत, अशी माहिती सौरभ राव यांनी दिली आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध कडक करण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परषद घेत नव्या निर्बधांसंदर्भात माहिती दिली.
थोडक्यात बातम्या-
पुण्यात आता लॉकडाऊनवजा निर्बंध; वाचा महत्त्वाची नियमावली
राज्यात अंशत: लॉकडाऊनची शक्यता; ठाकरे सरकारमधील मंत्र्याने सांगितली ‘अंदर की बात’!
पुण्यात कोरोनाचा कहर, लॉकडाऊनसंदर्भात अजित पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
पठ्ठ्या एक लाख रूपये किलोनं विकतोय ‘ही’ भाजी; वाचा देशात कुठे होतंय उत्पादन
लग्नाच्या दीड महिन्यानंतर बेबी बम्पसह फोटो शेअर करत दियाने दिली गुड न्यूज!
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.