मुंबई | महाविकास आघाडी सरकारच्या खातवाटपाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मंजुरीसाठी राजभवनावर पाठवण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रखडलेला ठाकरे सरकारचा खातेवाटप आज जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
खातवाटपाची संभाव्य यादी हाती आली आहे. यादीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सामान्य प्रशासन आणि विधी व न्याय खातं असणार आहे. तर आदित्य ठाकरेंकडे पर्यावरण आणि पर्यटन, एकनाथ शिंदेंकडं नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याकडील अर्थखाते काढून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आलं आहेत. तर जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा खाते देण्यात आलं आहे. महत्वाचं असणारं गृहखातं अनिल देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.
काँग्रेसच्या मंत्र्यांपैकी बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल, अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम देण्यात आले आहे. तर नितीन राऊत यांना उर्जा खातं देण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची यादी-
1. अजित पवार – वित्त व नियोजन (अर्थमंत्री)
2. जयंत पाटील – जलसंपदा
3. छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा
4. अनिल देशमुख – गृह
5. दिलीप वळसे पाटील – उत्पादन शुल्क व कौशल्य विकास
6. धनंजय मुंडे – सामाजिक न्याय
7. हसन मुश्रीफ – ग्रामविकास
8. बाळासाहेब पाटील – सहकार
9. राजेंद्र शिंगणे – अन्न व औषध प्रशासन
10. राजेश टोपे – आरोग्य
11. जितेंद्र आव्हाड – गृहनिर्माण
12. नवाब मलिक – कामगार, अल्पसंख्याक विकास
काँग्रेसची यादी –
1. बाळासाहेब थोरात – महसूल
2. अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम
3. के सी पाडवी – आदिवासी विकास
4. विजय वड्डेटीवार – ओबीसी, खार जमिनी, मदत आणि पुनर्वसन
5. यशोमती ठाकूर – महिला बालविकास
6. वर्षा गायकवाड – शालेय शिक्षण
7. अमित देशमुख – वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतीक कार्य
शिवसेनेची यादी-
1. एकनाथ शिंदे – नगरविकास
2. सुभाष देसाई – उद्योग
3. उदय सामंत – उच्च तंत्र शिक्षणं
4. अनिल परब – संसदीय कामकाज
5. शंकरराव गडाख – जलसंधारण
6. संदीपपान भुमरे – रोजगार हमी
7. गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
8. दादा भुसे – कृषी
9. संजय राठोड – वने
10. शंभूराज देसाई – गृहराज्यमंत्री ग्रामीण
11. अब्दुल सत्तार – महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री
12. बच्चू कडू – जलसंपदा शालेय कामगार
13.राजेंद्र यड्रावकर – आरोग्य, सांस्कृतिक, अन्न औषध प्रशासन मंत्री
महत्वाच्या बातम्या-
गेले दोन महिने राज्यातील जनता देवाच्या भरवशावर- चंद्रकांत पाटील https://t.co/dryDP3GRGi @BJP4Maharashtra @ShivSena @ChDadaPatil @INCMaharashtra @NCPspeaks
— थोडक्यात (@thodkyaat) January 5, 2020
स्मशानात राहूनही जनतेची कामं करत राहू; बंगला वाटपावरुन बच्चू कडू नाराज https://t.co/NdPyiFuMnd @RealBacchuKadu #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 5, 2020
CAAवर पहिल्यांदाच बोलला कॅप्टन कोहली; म्हणाला… – https://t.co/BwrQiYcG48 @imVkohli @BCCI @ICC #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 4, 2020
Comments are closed.