देश

धक्कादायक!!! फुकट भाजी दिली नाही म्हणून 14 वर्षीय मुलाला तुरूंगात डांबले!

पटणा | फुकट भाजी दिली नाही म्हणून पोलीस कर्मचाऱ्याने चक्क अल्पवयीन मुलाला जेलमध्ये टाकलं आहे. बिहारची राजधानी पटणा येथे ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

पंकज कुमार असं या 14 वर्षीय भाजी विक्रेत्या मुलाचं नाव आहे. पोलीस कर्मचाऱ्याने पंकजला फुकट भाजी मागितल्यावर त्याने नकार दिला. त्यावर पोलीस कर्मचाऱ्यानी खोटे गुन्हे दाखल करत त्याला अटक केली होती. गेल्या तीन महिन्यांपासून पंकजला बिउर जेलमध्ये डांबून ठेवण्यात आलं होतं.

दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना प्रकरणाची माहिती मिळताच 48 तासाच्या आत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

-काश्मीरच्या जनतेला स्वातंत्र्य हवं आहे; काँग्रेस नेत्याची मुक्ताफळं

-शिक्षकाच्या बदलीची बातमी ऐकताच विद्यार्थी भावुक

-राहुल गांधी मंदबुद्धी; भाजप खासदार सरोज पांडे यांचं वक्तव्य

-विखे-पाटील द्विधा मनस्थितीत; समजेना कोणत्या पक्षात जावे!

-अभिनेत्री काजोल चालता चालता पडली; पहा व्हायरल व्हीडिओ

-भाजप आमदाराच्या घरी प्रेयसीचा राडा; म्हणाली, “मी तुला सोडणार नाही!” 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या