Top News पुणे महाराष्ट्र

प्लीज पप्पा… बाहेर जाऊ नका बाहेर कोरोना आहे; लहानग्या चिमुकल्याची पोलिस बापाला आर्त साद

पुणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सध्या राज्यात आणि देशात संचारबंदी लागू केली आहे. याच दरम्यान एका पोलिस बापाचा आणि त्याच्या चिमुकल्याचा भावनिक व्हि़डिओ समोर आला आहे.

कर्फ्यू असला तरी पोलिसांनी त्यांची सेवा बजावण्याकरिता घराबाहेर पडावे लागत आहे. मात्र पप्पा बाहेर जाऊ नका… बाहेर कोरोना आहे, अशी आर्त साद तो चिमुकला मुलगा आपल्या बापाला घालत आहे. हा भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर होताना दिसून येत आहे.

अरे बाळा, मला साहेबांचा फोन आलाय मी जातो आणि दोनच मिनिटांत परत येतो, अशा शब्दात ते आपल्या मुलाला समजावण्याचा प्रयत्न करतात. मात्र मुलगा काही ऐकायला तयार नाहीये. तो जाऊ नका या एकाच हट्टावर ठाम आहे. भावनांपेक्षा शेवटी कर्तव्य श्रेष्ठ असतं हे पुणे पोलिस दलात कार्यरत असलेल्या माणिक घोगरे यांनी दाखवून दिलं आहे.

दरम्यान, विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना प्रशासन वारंवार आवाहन करत की घराबाहेर पडू नका. मात्र काही हट्टी नागरिक सातत्याने घराबाहेर पडत आहे. अशावेळी प्रशासनाला कठोर पावलं उचलावी लागत आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

‘कोरोनाला हरवण्याच्या संकल्पाची गुढी उभारा’; अजित पवारांचा साधेपणाने गुढीपाडवा

पोलीस दिसताच पत्नीला सोडून पुण्यातील पतीनं काढला पळ!

महत्वाच्या बातम्या-

मयताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार सुरूच; मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांना पोलिसांनी पकडलं

संकटाच्या परिस्थितीत मदत करण्यासाठी संघाचे स्वयंसेवक तयार- मोहन भागवत

घरात बसून मी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतो, तुम्ही तुमच्या गृहमंत्र्यांचं ऐका; उद्धव ठाकरेंचा मिश्किल अंदाज

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या