पोलिसांना का हवीय हल्लाबोल कव्हर करणाऱ्या पत्रकारांची माहिती?

औरंगाबाद | राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाची आज औरंगाबादमध्ये सांगता झाली. मात्र यावेळी पोलिसांनी पत्रकारांचे मोबाईल नंबर आणि घरचे पत्ते नोंदवून नेल्याचा आरोप करण्यात येतोय. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा आवाज दडपण्याची ही कृती असून मी याचा तीव्र शब्दांत निषेध करते, असं त्यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, हा प्रकार घडत असताना कुणीतरी अजित पवार यांच्या कानावर घातला. तेव्हा त्यांनी तडक घटनास्थळी येत संबंधित पोलिसांची चांगलीच कानउघाडणी केली. लय मस्तीत येऊ नका, असं ते पोलिसांना म्हटल्याचं कळतंय.