Top News पुणे महाराष्ट्र

गजानन मारणेनंतर आता ‘या’ कुख्यात गुंडावर गुन्हा दाखल

Photo Credit- Pixabay

पुणे | कुख्यात गुंड गजानन मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी पसरवलेल्या दहशतीमुळे आणि बेकायदेशीर मिरवणुकीमूळे त्याच्यासह 150 ते 200 समर्थकांवर गुन्हा दाखल झाला आहे. गजा सह त्याच्या 9 लोकांना पोलिसांनी अटक केल्यानंतर आता शरद मोहोळ या गुंडाविरेधातही गुन्हा दाखल झाला आहे.

काही दिवसांपूर्वीच मोहोळ टोळीचा म्होरक्या शरद मोहोळ याची कातील सिद्दिकीच्या खूनातून मुक्तता झाली होती. त्यावेळी त्याच्या समर्थकांनीही गजा समर्थकांसारखे दहशतीचे वातावरण निर्माण केलं होतं.

26 जानेवारीला एका कार्यक्रमात शरद उपस्थित राहिला असताना आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यासह 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पुण्यात आता एका पाठोपाठ एक कुख्यात गुंड गुन्ह्यातून निर्दोष सुटून येत असतील तर परत एकदा गुंडाराज येणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

थोडक्यात बातम्या-

दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, राहिले फक्त एवढे दिवस!

200 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, धरपकड सुरु; पुण्यातील या कारवाईनं गुंडांचे धाबे दणाणले!

नवीन कृषी कायदे लहान शेतकऱ्यांच्याच फायद्याचे- नरेंद्र मोदी

आयसीएआयचा ‘सीए’ करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दणका, वाचा सविस्तर!

उपमुख्यमंत्रीपदाबाबत बाळासाहेब थोरात यांचं मोठं वक्तव्य, म्हणतात…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या