Top News सांगली

16 लाख रुपयांचा बकरा चोरणारे अखेर पोलिसांना सापडले!

सांगली | सांगलीतील चोरीला गेलेला 16 लाखांचा बकरा अखेर सापडला आहे. आटपाडीमधील उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित जनावरांच्या बाजारातील प्रसिद्ध मोदी बकरा आणि त्याचाच वंश असलेला हा बकरा त्यावेळी चर्चेचा विषय ठरलेला.

शनिवारी पहाटे 16 लाख रूपये किंमत असलेल्या या प्रसिद्ध बकऱ्याची चोरी झाली होती. बकऱ्याची चोरी करणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शिवाय बकराही पोलिसांनी हस्तगत केलाय.

सांगलीतील हा बकरा राज्यभर प्रसिद्ध आहे. शनिवारी एका आलिशान गाडीतून हा बकरा लंपास करण्यात आला होता.

आटपाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस नायक अमोल कराळे, रामचंद्र खाडे, नितीन मोरे, प्रमोद रोडे यांनी तात्काळ तपास करत आरोपींना जेरबंद केलंय.

थोडक्यात बातम्या-

सासूनं सोसले विधवेचे चटके; सुनेलाही ते बसू नयेत म्हणून करुन दिला पुनर्विवाह!

संजय राऊत बोलले त्यामध्ये तथ्य असणार- जयंत पाटील

ईडीचा राजकारणासाठी वापर असं महाराष्ट्रात कधीही पाहिलं नाही- अनिल देशमुख

मोठ्या विधवा भावजयीसोबत दीर करणार लग्न; अहमदनगरमधील स्तुत्य घटना

अक्षय कुमारने वाढवलं मानधन; एका चित्रपटासाठी घेणार ‘इतके’ रूपये

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या