औरंगाबाद महाराष्ट्र

मारहाण करुन पोलिसाचे हात दुखले; मुख्याध्यापकाला सांगितलं, लोकांना हाणा!

लातूर | लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यात चापोलीमध्ये लाठीचार्ज करुन करुन पोलिसांचे हात दुखत असल्याने पोलिसांनी एका मुख्याध्यापकांनाच लाठीचार्ज करायला लावल्याचा प्रकार समोर आला आहे. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दत्ता कुलकर्णी असं या मुख्याध्यापकांचं नाव आहे. ते चापोली येथील स्वामी विवेकानंत विद्यालयात मुख्याध्यापक आहेत. तर सुभाष हरणे असं संबंधित पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनीच लाठीचार्ज करण्याची परवानगी दिल्याने मुख्याध्यापक दत्ता कुलकर्णी यांनी देखील रस्त्यावर फिरणाऱ्या वाहन चालकांना जोरदार चोप दिला. त्यांनी अगदी पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे संचारबंदीत वाहतूक करणाऱ्या किंवा ये-जा करणाऱ्या लोकांना बेदम मारहाण केल्याचा आरोप होत आहे.

दरम्यान, पोलिसही शेजारी उभे राहून संबंधित मुख्याध्यापकांना मारहाण करण्यास प्रोत्साहन देत होते. ते कसलंही म्हणणं ऐकून न घेता मारहाण करत होते, असा आरोप करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतूक मंत्र्यांनी घेतला हा मोठा निर्णय!

दिलासादायक! पुण्यात 24 तासांत 5 जण कोरोनामुक्त, 48 तासांत एकही नवा रुग्ण नाही

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 124 वर; मुंबई-ठाण्यात नवे रुग्ण सापडले

‘देवदूतां’च्या मदतीला सिद्धिविनायक; लॉकडाऊनमध्ये पोलिसांसाठी जेवणाची सोय

कौतूकास्पद! Parle G कंपनी पुढच्या 3आठवड्यात वाटणार 3 कोटी बिस्किट पुडे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या