बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जिल्ह्याची हद्द ओलांडणं संभाजी भिडेंना महागात; पोलिसांत गुन्हा दाखल

कोल्हापूर | लॉकडाउनचा नियम मोडल्याने शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.  संभाजी भिडे यांनी सांगली ते कोल्हापूर असा प्रवास केला त्यासाठी त्यांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंडियन पिनल कोड कलम 188 अंतर्गत भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयसिंगपूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगली जिल्ह्यातून परवानगी नसताना कोल्हापूर जिल्ह्यातील उदगांवमध्ये प्रवास आल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आंतर-जिल्हा प्रवेश करण्यास मर्यादा आणल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी प्रशासनाची प्रथमत: परवानगी घ्यावी लागते.

मात्र भिडे गुरुजी यांनी या नियमाचे उल्लंघन करत प्रवास केला होता. त्यामुळे त्यांच्यावर शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे प्रवेश केल्याने जिल्हा संचारबंदीचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

अक्षय बोऱ्हाडेप्रकरणी आढळरावांचा मोठा निर्णय, खा. कोल्हेंना धक्का!

‘महाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका’; भाजप नेत्याची प्रमोद सावंतांकडे मागणी

महत्वाच्या बातम्या-

प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवालांचं निधन; ‘ही’ भविष्यवाणी खरी ठरल्यानं सारा देश हादरला होता!

अबू आझमींविरोधात गुन्हा दाखल; महिला पोलिसाला अपशब्द वापरल्याचा आरोप

कुख्यात डॉन अरुण गवळीबाबत नागपूर न्यायालयाचा मोठा निर्णय!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More