बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलीस हवलदाराला जबर मारहाण!

पुणे | कोरोनाने देशात थैमान घातलं आहे. अशातच मास्क घालणं अनिर्वाय असून अनेक नियम लागू करण्यात आले आहेत. तसेच नियम पाळले नाही तर दंड देखील आकारण्यात येत आहेत. मात्र तरी देखील अनेक जण नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत. अशातच पुण्यात एक कारचालक विनामास्क कार चालवत असल्यामुळे त्याच्यावर कारवाई करणाऱ्या पोलीस हवलदाराला कार चालकाने मारहाण केल्याचं समोर आलं आहे.

संबंधित कार चालकाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव मनविंदर सिंग भाटिया असं आहे. रविवारी लाॅकडाऊन असताना देखील भाटिया विनामास्क कार घेऊन जाताना पाहून पोलीस हवालदार सतिश देवकर यांनी त्यांना थांबण्याचा इशारा दिला. मात्र भाटिया थांबले नाही आणि पुढील सिग्नलवर जाऊन थांबले. यादरम्यान इतर लोकांना तेथून जाताना त्रास होईल अशा पद्धतीने भाटिया यांनी गाडी सिग्नलच्या येथे लावली.

सिग्नलवर गाडी लावून भाटिया गाडीतून उतरले आणि पोलीस हवलदाराजवळ जाऊन वाद घालू लागले. यादरम्यान भाटिया यांनी विनामास्कचे मनपाचे पावती पुस्तक व त्याचे लायसन्स जबरदस्तीने हिसकावून शासकीय कामात अडथळा आण्याचा प्रयत्न केला. देवकर हे पावती पुस्तक परत घेत असताना त्यांच्या डाव्या हाताला मारहाण देखील करण्यात आली.

दरम्यान, या प्रकरणानंतर देवकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे.सतिश देवकर हे सांगवी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. ते रविवारी सकाळी पिंपळे सौदागर येथील शिवार चौकात कर्तव्यावर होते. यादरम्यान ही घटना घडली आहे.

थोडक्यात बातम्या-

आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमधील या खेळाडूच्या वडिलांचं कोरोनाने निधन 

“सुप्रीम कोर्टाला टास्क फोर्स नेमावी लागते, मग केंद्र सरकार काय करतंय?”

“संजय राऊतांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही अन् ‘सामना’ही वाचत नाही”

“उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला नाही, त्यांनी राजीनामा द्यावा”

एकेकाळी शरद पवारांचे कट्टर विरोधक समजले जाणारे संभाजीराव काकडे यांचं दु:खद निधन

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More