Top News महाराष्ट्र सांगली

राजकीय नेते कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत, खरं तर ही आमची मोठी चूक- विश्वजीत कदम

Photo Credit- Facebook/Vishwajeet Kadam

सांगली |  राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. पॉझिटीव्हिटीचा दर वाढू लागला आहे. यातच अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

अजूनही काही राजकीय मंडळी कोरोनाला हलक्यात घेत आहेत. तसेच सोशल डिस्टन्सचे नियम न पाळता मेळावे, सभा घेत आहेत. यावर कोरोनाचे नियम पाळण्यामध्ये आमचं चुकतंय, अशी कबुली विश्वजीत कदम यांनी दिली आहे.

दुर्दैवाने आम्ही ना सोशल डिस्टन्स पाळतोय ना पूर्णवेळ मास्क लावतोय. खरं तर ही आमची मोठी चूक आहे आणि ही चूक आम्ही केली नाही पाहिजे, असं विश्वजीत कदम यांनी म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यातील खानपूर नगरपंचायत मधील 3 कोटी 82 लाख रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन विश्वजीत कदम आणि शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या हस्ते झालं आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. काही भागांत तर लॉकडाऊन करण्याचा प्रशासन विचार करत आहे. तसंच राज्यात जरी कोरोना लसीकरणाची प्रक्रियेला सुरुवात झाली असली तरी सर्वसामान्य लोकांच्या प्रक्रियेला अजून बराच वेळ लागणार असल्याचंही विश्वजीत कदम यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

“सकाळी आयसोलेशन, रात्री सेलिब्रेशन…हाच आहे काँग्रेसचा तमाशा”

पेट्रोल भरताना तरूणाने केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

हे सरकार दारुडं सरकार आहे- सदाभाऊ खोत

अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईल- रामदास आठवल

पुण्यात आता मास्क न घातल्यास ‘इतका’ दंड भरावा लागणार!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या