बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…म्हणून शिवसेनेतून एक टपरीवाला आज मंत्री होऊ शकतो”

सोलापूर | मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चांगलीच खडाजंगी पहायला मिळत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्व पक्षांचे नेते जोरदार तयारीला लागल्याचं दिसून येतंय, अशातच आता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगोल्यातील एका सभेत मोठं वक्तव्य केलं आहे.

राजकारणी हे खरे नटसम्राट असतात. राजकारण्यांना सर्व प्रकारच्या भूमिका पार पाडाव्या लागतात. शिवसेनेमध्ये नेहमीच सामाजिक कामांना नेहमीच प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच शिवसेनेच्या माध्यमातून आज एक टपरीवाला मंत्री होतो. राजकारणात कोणाला पाणी पाजायचे असेल तर आपल्याकडे पाणी असावे लागते, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

बापू तुम्ही काळजी करू नका, हा पाणीपुरवठा मंत्री तुमच्या पाठीशी आहे. तालुक्‍यातील एकही गाव पाण्यावाचून वंचित राहणार नाही, असं आश्वासन देखील गुलाबराव पाटलांनी सांगोलाकरांना दिलं आहे. 81 गावची पाणीपुरवठा योजना यापुढेही सुरू राहणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, आज महाविकास आघाडीची गाडी सुसाट आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. कोण जास्त बोलतं, त्याच्यावर आजकाल ईडी लावली जाते, कारवाई करायला काही हरकत नाही, मात्र, कारवाई सर्वांवर सारखीच झाली पाहिजे, असंही पाटील यावेळी म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! समीर वानखेडे यांना मुंबई पोलिसांचं समन्स; ‘या’ प्रकरणात चौकशी होणार

“मी कोणत्याही मंत्रिपदावर नाही, त्याचं मला फार दु:ख वाटत नाही”

“सावरकर देशातील स्वातंत्र्य वीरांचे मुकूटमणी, पण भाजप नेत्यांनी…”

पुढील 4 दिवस महत्त्वाचे! राज्यातील ‘या’ 14 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याला उच्च न्यायालयाचा दणका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More