बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशाला लागलेली कोरोनापेक्षा घातक कीड म्हणजे राजकारण- तेजस्विनी पंडीत

मुंबई | सध्या कोरोनाने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात लॉकडाऊनच्या सूचना दिल्या आहेत. मात्र लसीचा तुटवडा, बेड उपलब्ध नाहीत आणि ऑक्सिजनची कमी अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहेत. अशातच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.

सगळ्यात मोठी “कीड” जर आपल्या देशाला, आपल्याच नाही, तर सगळ्या जगाला लागली आहे, ती आहे “राजकारण” ही “कीड” कोविडपेक्षा भयाण, घातक आणि वर्षानुवर्षे आपल्याला पोखरत जाणारी आहे. या “कीड”पासून बचाव करता आला तर बघा! अवघड आहे सगळंच…काळजी घ्या, असं तेजस्विनी पंडीतने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

तेजस्विनी पंडीतने आपला संताप इन्टाग्रामच्या माध्यमातून पोस्ट करत व्यक्त केला आहे. याआधीही अनेक कलाकांरानी अशाप्रकारे संताप व्यक्त केला होता. प्रसिद्ध अभिनेता संदीप पाठकनेही सरकारला सवाल केला होता. महाराष्ट्रात कोरोना जास्त असताना लसींचा पुरवठा कमी का?,  असा सवाल संदीपने केला होता.

दरम्यान, राज्यातील कोरोनाची स्थितीही गंभीर आहे. रुग्णसंख्येचा आलेख वाढताच आहे. त्यामुळे राज्यात सध्या लॉकडाऊन जरी नसला तरी कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. जबाबादार नागरिक म्हणून आपण कोरानाच्या नियमांचं पालन करायला हवं, जेणेकरून आपल्याला कोरोनापासून दूर राहता येईल.

थोडक्यात बातम्या- 

पुण्यात बापानं 2 पोरींवर ट्रक चढवला अन् स्वतःलाही संपवलं, कारण अत्यंत धक्कादायक

“हे कृत्य करून तुम्ही चुकलात…याची किंमत मोजावी लागणार”

आज पुण्यात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

देवेंद्र फडणवीसांनी कुत्र्या-मांजराचा खेळ खेळू नये- एकनाथ खडसे

दिवसभरात फक्त 2 लवंग खा… होतील विश्वास बसणार नाहीत इतके फायदे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More