बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काय सांगता! पोलार्डने बॅटने नाही तर हेल्मेटने मारला चौकार, पाहा व्हिडीओ

मुंबई | मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात मुंबईने सहज विजय मिळवला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा फलंदाज कायरन पोलार्डने बॅटनेन नाही तर हेल्मेटने चौकार मारला. नक्की काय घडलं होतं?, तर राजस्थानने दिलेल्या 172 धावांचा पाठलाग करताना मुंबईने हे आव्हान 7 विकेट्स राखून पूर्ण केलं आणि विजय मिळवला.

पोलार्ड फलंदाजी करत असताना 18 व्या षटकात ख्रिस मॉरिसनं कायरन पोलार्डला शॉर्ट पिच बाऊन्सर चेंडू टाकला. चेंडू सोडून देण्यासाठी पोलार्ड खाली वाकला आणि चेंडू त्याच्या हेल्मेटवर आदळून हवेत उडाला. त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या दिशेनं जात होता. पोलार्ड चेंडूला जा, जा, असं हाताने ढकल्याची अॅक्शन करत होता.

पोलार्ड  चेंडूला उद्देशून सीमेरेषेच्या दिशेनं जाण्याचे हातवारे करत होता तेव्हा ख्रिस मॉरिसही हसला.त्यानंतर पोलार्डनं मग मॉरिसला हस्तांदोलन करुन खेळभावनेचा सन्मान केला. गेल्या काही सामन्यांपासून मुंबई इंडियन्सची रुळावरुन घसरलेली गाडी आज पुन्हा रूळावर आली.

दरम्यान,मनोरंजनासाठी वेस्ट इंडिजचे खेळाडू प्रसिद्ध आहेत. यामध्ये ब्राव्हो, ख्रिस गेल, पोलार्ड हे क्रिकेटसोबत डान्ससाठीही ओळखले जातात.

 

थोडक्यात बातम्या- 

कोरोनातून बरे झालेल्यांनी लस घ्यावी की नाही?; तज्ज्ञांनी दिला हा मोलाचा सल्ला; म्हणाले…

“मुंबईत ‘इतके’ लसीकरण राहणार बंद”; अतिरिक्त आयुक्तांनी दिली माहिती

पंतप्रधानांनी बोलवली केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक; मोठा निर्णय होण्याची शक्यता

“चार महिन्यात ठाकरे सरकारचे सहा मंत्री सीबीआयच्या दारात असतील”

“20 मिनिटात ॲम्ब्युलन्स नाही आली, तर मी सगळ्या ॲम्ब्युलन्स रॉकेल टाकून फुकुन देईल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More