बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पूल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपीला केंद्राची मान्यता; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई |  महाराष्ट्राता प्लाझ्मा थेरपी आणि पूल टेस्टिंगला केंद्राने परवानगी दिली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. केंद्रिय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत केंद्राने मान्यता दिली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी प्लाझ्मा थेरपी आणि पूल टेस्टिंगला केंद्राकडे परवानगी मागितली होती. त्याला केंद्राने आता संमती दर्शवली आहे. आपण मुंबई , पुणे, नागपूर, सोलापूरमध्ये प्लाज्मा थेरपी सुरु करणार आहोत, असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

प्लाझ्मा थेपरी म्हणजे काय???- कोरोतून पूर्णपणे सावरलेला व्यक्ती त्याच्या शरीरात रोगप्रतिकारक क्षमता वाढवणाऱ्या पेशी तयार झालेल्या असतात त्या पेशी सध्या कोरोनाने ग्रासलेल्या रूग्णांच्या शरीरात टाकल्या जातात. त्यामुळे कोरोनाग्रस्ताची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते आणि याने कोरोनाबाधित लवकरात लवकर बरा होण्याची शक्यता अधिक असते, या सगळ्या प्रकाराला प्लाझ्मा थेरपी असं म्हणतात. प्लाझ्मा थेरपीमुळए रिकव्हरी रेट म्हणजे रूग्ण ठणठणीत बरा होण्याचा दर वाढू शकतो, ही खीप दिलासादायक बाब आहे. प्लाझ्मा थेरपी ही सर्वप्रथम अमेरिकेत पार पडली होती. कोरनाला संपवण्यासाठी प्लाझ्मा थेरपी ही खूप उपयोगी ठरणार आहे.

पुल टेस्टिंग म्हणजे काय???- दुसरीकडे पूल टेस्टिंगची परवानगी देखील महाराष्ट्राला मिळाली आहे. पुल टेस्टिंग म्हणज एकाचवेळी 5 जणांच्या घशाच्या स्त्रावाची चाचणी केली जाते. आयसीएमआरच्या नियमांप्रमाणे एकाचवेळी 5 जणांचे स्वॅब टेस्ट घेतले जातात. यापैकी जर कुणालाही कोरोनाची लागण नसेल तर स्वाभाविकपणे कोरोनाची चाचणी निगेटीव्ह येईल. अशी चाचणी करण्याने एकाच वेळी 5 जणांची कोरोना टेस्ट होऊ शकते. कमी कालावधीत अनेक जणांच्या कोरोना टेस्ट होऊ शकतात. तसंच कमी किंमतीत टेस्ट होऊ शकतात.

ट्रेंडिंग बातम्या-

विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा कधी होणार?, उदय सामंत म्हणाले…

कोरोनामुळे जगभरातील उद्योग बुडाले मात्र ‘या’ तीन उद्योजकांची चांदी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More