बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

औरंगाबाद पाठोपाठ ‘या’ जिल्ह्यातही लॉकडाऊनची शक्यता

अहमदनगर | अहमदनगर जिल्ह्यात ‘कोरोना’ रुग्ण वाढीचा वेग आता तिप्पट झाला आहे. त्यामुळे औरंगाबाद पाठोपाठ आता नगर जिल्ह्यातही दक्षता घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सायंकाळी सहा वाजता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फेब्रुवारी महिन्यात खाली आलेले ‘कोरोना’चे आकडे मार्चमध्ये वाढतच आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नवे रुग्ण वाढीची दैनंदिन संख्या 45 पर्यंत खाली आली होती. आता ती 362 वर गेली आहे. मार्चच्या पहिल्या दिवसापासून हा आकडा 200च्या पुढे कायम असून त्यात सतत वाढ होत आहे.

अहमदनगर मध्ये सध्या 1636 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दररोज बरे होऊन परतणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. फेब्रुवारी अखेर नवीन येणाऱ्या रुग्णांची सरासरी संख्या शंभर होती. आता ती 300च्या वर गेली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील स्थिती गंभीर वळणावर असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसंख्येच्या तुलनेत दोन्ही ठिकणाची रुग्ण संख्येची परिस्थिती सारखीच असल्याचे दिसून येते. नगर जिल्ह्यात सध्या रात्रीची संचारबंदी आहे. लग्न आणि अन्य कार्यक्रमांवर निर्बंध आहेत, मात्र, दंड केला जात असला तरीही लग्न समारंभ सुरूच आहेत. त्यामुळे अहमदनगरच्या बाबतीत आता काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

थोडक्यात बातम्या –

कोरोना संकटात आरोग्य विभागासाठी राज्य सरकारने दिला भरीव निधी

‘महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास…’; अर्थसंकल्पात महिलांसाठी अजित पवारांनी केली मोठी घोषणा!

नियमीतपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अजित पवारांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

31 लाख 23 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ झाला- अजित पवार

मुंबईकरांवर पुन्हा एकदा लॉकडाऊनची टांगती तलवार?; पालकमंत्र्यांकडून लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More