बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पोस्टाची भन्नाट योजना, खातं उघडा आणि दरमहा मिळवा ‘इतके’ रूपये

नवी दिल्ली | गुंतवणुकीसाठी सध्या अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, आपल्या देशात गुंतवणुकीसाठी एक विश्वासार्ह पर्याय म्हणून पोस्टाच्या योजनांकडे पाहिलं जातं. भविष्याचा विचार करून गुंतवणूक करत असाल तर पोस्टाची एमआयएस योजना तुमच्यासाठीच आहे.

एमआयएस ही पोस्टाची अशी योजना आहे ज्यात एकदा गुंतवणूक केली की तुम्ही दरमहा व्याजाचा लाभ घेऊ शकता. तुमच्या मुलांचं वय 10 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही त्यांच्या नावानेही खातं उघडू शकता. दर महिन्याला जे व्याज मिळेल त्यातून तुम्ही मुलांच्या शाळा किंवा ट्युशनची फी देखील भरू शकता.

तुमच्या मुलांचं वय 10 वर्षांपेक्षा जास्त असेल तर त्यांच्या नावाने 2 लाख रूपये जमा करा. यावर तुम्हाला दरमहा 6.6 टक्के व्याजदराने 1100 रूपये मिळतील. या योजनेची मॅच्युरिटी 5 वर्षांची आहे. पाच वर्षात व्याजाची रक्कम 66 हजार होईल व तुम्हाला 2 लाख रूपये देखील मिळतील.

दरम्यान, एमआयएस खाते हे एकट्याने किंवा संयुक्त खाते तीन जणांच्या नावाने उघडू शकता. या योजनेची कमाल मर्यादा ही 4.5 लाख रूपयांची आहे. 4.5 लाख रूपये जमा केले तर तुम्हाला दर महिन्याला 2475 रूपयांचा लाभ होऊ शकतो.

थोडक्यात बातम्या-

“चिखल फेकणाऱ्यांचे हात किती बरबटलेले, हे सुद्धा देशाला कळायला हवं”

धक्कादायक! दोन वेळच्या अन्नासाठी ‘या’ ठिकाणी मुलं आणि किडनी विकण्याची वेळ

युक्रेनच्या रस्त्यावर महाकाय रशियन फौज, धक्कादायक फोटो समोर

Petrol Diesel Price : महिन्याच्या पहिल्या दिवशी इंधन दरात काय बदल झाले, वाचा एका क्लिकवर

युक्रेनमधून 182 विद्यार्थी मुंबईत, नारायण राणेंनी विमानतळावर केलं स्वागत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More