बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदींविरोधात पोस्टर लावले, पोलिसांकडून 100 जणांना अटक

नवी दिल्ली | कोरोना महामारीमुळे लसीकरण प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली आहे, परंतू आता लसीकरण मोहीम फार हळूवार गतीने चालू आहे. त्यामुळे केंद्र सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. त्यातच आता देशातील विरोधीपक्ष काँग्रेसने सोशल मीडियावरून मोदी सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. याच टीकेचे पोस्टर लावल्यानं पोलिसांकडून 100 जणांना अटक करण्यात आली आहे.

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी एका फलकाचे फोटो ट्विटरच्या प्रोफाईलवर लावले आहेत. त्यात त्यांनी मोदीजी, हमारे बच्चों की वैक्सीन विदेश क्यो भेजी? असा सवाल केला आहे. त्यानंतर देशभरातील काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही ट्विटरच्या प्रोफाईलवर हे फोटो लावले आहेत. हे पोस्टर प्रिंट करून दिल्लीत लावण्यात आले होते. असे पोस्टर लावणाऱ्या 100 जणांना दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

या 100 जणांमध्ये 30 रिक्षाचालक आहेत. तर 19 जण शाळा सोडलेले तरूण आहेत. त्याचबरोबर 61 लोक हे लाकडी चौकटी बनवण्याचं काम करतात. परंतू, यातील काही जणांना हे कोणत्या कारणासाठी तयार केलं जात होतं. हे माहित देखील नव्हतं. तरीही त्यांना अटक करण्यात आली आहे. 600 रूपये घेऊन हे पोस्टर लावण्याचं काम राहुल त्यागी नावाच्या व्यक्तीनं हातात घेतलं होतं. पण त्याला या राजकीय प्रकरणाची माहिती नव्हती, असं त्यानं म्हटलं आहे.

दरम्यान, या प्रकरणानंतर राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेत मलाही अटक करा, असं म्हटलं आहे. त्यानंतर ही मोहिम आणखी वाढली आहे. ट्विटरवर अनेकांनी हा फोटो प्रोफाईलला लावला आहे. त्यामुळे आता मोदी सरकारच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

नवऱ्यानं केली नसबंदी, त्यानंतर पत्नी प्रेग्नंट राहिल्यानं छळ, तपासात धक्कादायक माहिती समोर

कोरोनामुळे पत्नीला आलं टेन्शन, पतीनं केलं असं काही की पोलिसांनी केली अटक

वातावरण बदलतंय, कोरोनासोबत डेंग्यूचाही धोका वाढतोय; अशी घ्या स्वत:ची काळजी!

“मोदीजी, आमच्या लेकरांची लस परदेशात का पाठवली?”; देशव्यापी मोहीम सुरु

अवघ्या 100 रुपयांसाठी दाम्पत्याने मिळून केली युवकाची हत्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More