बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“प्रभू श्रीराम संपूर्ण जगाचे, ते फक्त भाजप आणि आरएसएसचे नाहीत”

चंदीगड | भारताचे दिवगंत उपपंतप्रधान देवीलाल यांच्या 108 व्या जयंती सोहळ्याचा कार्यक्रम हरियाणाच्या जिंद येथे पार पडला. या कार्यक्रमास जम्मू आणि काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला उपस्थित होते. मोदींनी 50 हजार नोकऱ्यांचं आश्वासन दिलं होतं, पण कलम 370 हटवल्यानंतर अद्याप एकाही व्यक्तीस नोकरी मिळाली नाही, असं फारूख अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.

प्रभू श्रीराम हे अखंड जगाचे राम आहेत, फक्त हिंदूंचे राम नाहीत. भाजपला प्रभु श्रीराम फक्त आपलेच वाटतात. बाकी कोणाचे नाहीत. तसेच प्रभु श्रीराम हे फक्त भाजप आणि संघाचे नसून सर्व जगाचे आहेत, असं अब्दुल्लांनी म्हटलं आहे.

काश्मीर भारताचा भाग कधी नव्हता? आम्ही गांधीचा भारत स्वीकारला, जिनांचा पाकिस्तान नाही. आम्ही म्हणलो की, आम्ही भारतात राहू आणि मरूही. जे लोक म्हणतात की, कलम 370 रद्द केल्यावर भारतास बळकट केलं आहे, त्यांना मी सांगू इच्छित आहे की, भारतास कमकुवत केलं आहे, असं अब्दुल्ला म्हणाले आहेत.

दरम्यान, मोदी सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे. त्यांना शेतकऱ्यांचा बळी द्यायचा आहे. तसेच मोदी सरकार हे उद्योगपतींचे सरकार आहे, म्हणत अब्दुल्लांनी कृषी कायद्यांवरून मोदी सरकारवर टीका केली आहे.

थोडक्यात बातम्या –

“मोदीजी म्हणतील, मैं संजय राऊत के सामने रहता हूँ”

”उद्धव ठाकरेंना वाटेल तोपर्यंतच महाविकास आघाडी सरकार टिकेल”

मी स्वतःला भाग्यवान समजतो…, शिक्षण क्षेत्रात डॉ. राजेंद्र विखे पाटील यांचे काम उल्लेखनीय चंद्रकांत पाटील

“कोल्हापूरचा गडी कोथरूडला आलाय, पण आमच्या अंगावर येऊ नका”

मोठी दुर्घटना! नदीत बोट उलटल्यानं 22 जण बुडाले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More