जळगाव महाराष्ट्र

धक्कादायक! राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यानेच केले एकनाथ खडसेंवर अत्यंत गंभीर आरोप

जळगाव | राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते असलेले जामनेरमधील प्रफुल्ल लोढा यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह गिरीश महाजन, रामेश्वर नाईक आणि पारस ललवाणी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांच्या गैरकृत्याची फाईल माझ्याकडे असल्याचं मी एकनाथ खडसे यांना सांगितलं होतं. यानंतर ही फाईल आपल्याला मिळावी, यासाठी खडसे यांनी आपल्याकडे मागणी केली होती. मात्र त्या फाईलमध्ये काही निरपराध लोकांचं सार्वजनिक आयुष्य खराब होणार असल्याने आपण ती त्यांना दिली नाही, असं लोढा यांनी सांगितलं आहे.

खडसे हे अतिशय खालच्या पातळीचं राजकारण करत असून त्यांनी आपल्या विश्वासाला त्यांनी धोका दिला आहे, असा आरोपही लोढा यांनी केला आहे.

ही फाईल महत्वाची असल्याने खडसेंनी गृहमंत्र्यांची दिशाभूल करत पुणे पोलिसांच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मदतीने बीएचआर घोटाळ्याशी आपला संबंध असल्याचं भासवून ती फाईल मिळविण्यासाठी आपल्या घराची तसेच आपल्या जवळच्या मित्रांच्या घराची आणि नातेवाईकांची तपासणी केली, असं लोढा यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

रूपाली चाकणकर यांचं कार्यालय पेटवून देण्याची धमकी!

मुंबई विद्यापीठाचं दुसरं सत्र ‘या’ तारखेपासून सुरू!

“विरोधी पक्षांची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी सांभाळण्यासारखी झालीये”

तेजस ठाकरेंची दमदार कामगिरी; चन्ना प्रजातीचा शोध

“राहुल गांधींची मेहनत वाखणण्याजोगी पण कुठेतरी ते कमी पडतायत”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या