नवी दिल्ली | मुस्लीम प्रशासकांच्या काळातील घटनांवरुन वेगवेगळ्या ठिकाणांना देण्यात आलेली नावं ही अपवित्र असून ती बदलण्याची गरज असल्याचं भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटलं आहे. एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
भोपाळच्या खासदार उमा भारती यांनी केलेल्या नामांतरणाच्या मागणीला प्रज्ञा यांनी पाठिंबा दर्शवत हलालपुरा बस स्टॅण्ड, लालघाडी आणि इस्लाम नगर ही नाव बदलण्याची मागणी केली आहे.
मुस्लीम प्रशासकांच्या काळात रक्तरंजित इतिहास असणाऱ्या सर्व ठिकाणांची नावं आम्ही भोपाळमधून पुसून टाकणार आहोत, असं प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, हलालपुरा बस स्टॅण्ड, लालघाडी आणि इस्लाम नगर ही नावं बदलण्यात यावीत अशी मागणीही केली आहे. ही नावं म्हणजे अत्याचार करणाऱ्या मुस्लीम शासकांच्या दहशतीची निशाणी असल्याचं प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या.
थोडक्यात बातम्या-
विराट कोहलीला केरळ उच्च न्यायालयाचा दणका; पाहा काय आहे प्रकरण…
‘…तेव्हा आशिष शेलार तुम्ही झोपले होते का’; राष्ट्रवादीचा शेलारांवर पलटवार
‘गिरीश बापट यांचा स्वभाव काँग्रेससारखा’; अजित पवारांच्या बापटांना कोपरखळ्या!
‘अबू आझमींचं दिल्लीतील हिंसाचाराशी कनेक्शन’; ‘या’ भाजप नेत्याचा गंभीर आरोप
“हरलो म्हणून खचून जायचं नाही हे मराठमोळ्या अजिंक्य रहाणेनं दाखवून दिलं”